Tuesday, August 19, 2008

Saahitya Sammelan At Maalgund In December

मालगुंडला डिसेंबरमध्ये मराठी साहित्य संमेलनरत्नागिरी, ता. १७ - कोकण मराठी साहित्य परिषदेचे ११ वे कोकण मराठी साहित्य महासंमेलन ६ ते ८ डिसेंबर २००८ या काळात मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे कवी केशवसुत साहित्यनगरीत होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रख्यात कादंबरीकार विश्‍वास पाटील भूषविणार असून, उद्‌घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कोमसापचे अध्यक्ष पु. द. कोडोलीकर यांनी रविवारी (ता. १७) दिली. मालगुंड येथे १६ ऑगस्टला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कवी केशवसुत स्मारकाचे उद्‌घाटन करण्यासाठी कृषिमंत्री शरद पवार येणार होते; पण त्या वेळी काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. स्मारकाला भेट देण्याची त्यांची इच्छा महासंमेलनाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून ६ डिसेंबरला दुपारी तीनला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंचा'वर उद्‌घाटन सोहळा होणार आहे. त्यापूर्वी दुपारी २ वाजता निघणाऱ्या ग्रंथदिंडीत मालगुंड पंचक्रोशीतील एक हजार विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. वातावरणनिर्मितीसाठी रत्नागिरी शहरातही ६ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडी निघणार आहे. "पानिपत'कार विश्‍वास पाटील यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून येण्याचा "कोमसाप'ला शब्द दिला आहे. त्यांची विस्तृत मुलाखत महासंमेलनात साहित्य रसिकांना ऐकायला मिळणार आहे. ताज्या वाङ्‌मयीन विषयांवरील परिसंवाद, दोन कविसंमेलने, कोकणच्या बोलीभाषांचा आविष्कार, मधू मंगेश कर्णिक यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, कर्तृत्ववान महिलांची आत्मकथने, युवाशक्तीचे वाङ्‌मयीन नवे उन्मेष आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची साभिनय मुलाखत असा या महासंमेलनाचा भरगच्च कार्यक्रम आहे. यंदाचा कोकण साहित्यभूषण हा "कोमसाप'चा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर यांना महासंमेलनाच्या समारंभ सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. संमेलन समितीचे प्रमुख परेन शिवराम जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत कार्यक्रम ठरविण्यात आले. या महासंमेलनाच्या स्थानिक आयोजन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून दिलीप ऊर्फ नाना मयेकर आणि प्रमुख कार्यवाहपदी डॉ. विवेक भिडे यांची निवड करण्यात आली. खासदार अनंत गिते, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, पंचायत समिती सभापती सौ. साधना साळवी आयोजन समितीचे सल्लागार आहेत, अशी माहिती श्री. कोडोलीकर यांनी दिली. या वेळी कार्याध्यक्ष महेश केळुसकर, महासंमेलनाचे प्रवक्ते अशोक बागवे, कार्यवाह अशोक ठाकूर, सौ. नमिता कीर, प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.

Reply

Monday, August 11, 2008

Lies On Saahitya Sammelan ....For How Long....?

खोटारडेपणा तरी किती काळ?

(संतोष शेणई) सॅन होजेला साहित्य संमेलन घेण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पहिल्यापासून खोटारडेपणानेच वागत आले आहे. घटनेची पायमल्ली करीत निर्णय घ्यायचे आणि नंतर शब्दांचा खेळ करीत मराठी रसिकांना फसवायचे, असे हे वागणे आहे. .......अखिल विश्‍वात "चक दे मराठी' करायचे असल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि निवडक सदस्य मराठी साहित्य संमेलनाबाबत चकवेगिरी करीत आहेत. उगाच शंका घेऊ नका रं, आम्हाला सॅन होजेला जाऊ द्या की, असा सूर या मंडळींचा आहे. येथील संमेलन रद्द करून सॅन होजेला संमेलन घेण्याच्या महामंडळाच्या निर्णयाला महाराष्ट्रातून सर्व स्तरांतून विरोध होताच, महामंडळाला एक पाऊल मागे जावे लागले. पण त्यानंतर महामंडळाने चकवा देणे सुरू केले आहे. याबाबत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, सॅन होजेच्या संमेलनाच्या आड न्यायालयीन वादासारखी काही विघ्ने येऊ नयेत यासाठी महामंडळाची मंडळी दिशाभूल होईल अशी विधाने जाणीवपूर्वक करीत आहेत. खरे तर सॅन होजेच्या संमेलनाला विरोध नव्हताच; पण घटनाबाह्यरीतीने तेथे संमेलन घेऊ नये आणि भारतातील संमेलनाला ते पर्यायी असू नये एवढीच पहिल्यापासून येथील वाचकांची, लेखकांची, प्रकाशकांची मागणी होती. पण महामंडळाला या दोन्ही गोष्टी मान्य नसल्याने सॅन होजेसाठी विमानांचे उड्‌डाण होईपर्यंत हा चकवा कायम राहील. परस्परविरोधी निवेदने कोणत्याही परिस्थितीत सॅन होजेला फेब्रुवारी २००९ मध्ये साहित्य संमेलन घ्यायचेच आणि त्याआधी भारतात संमेलन होऊ द्यायचे नाही, अशी महामंडळाची योजना आहे. त्यानुसारच गेल्या दोन - तीन महिन्यांत महामंडळाचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. "भारतातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही, तर योग्य वेळी म्हणजे २००९ मध्ये ते संमेलन घेण्यात येईल. सॅन होजेला बे एरिया महाराष्ट्र मंडळातर्फे विश्‍व संमेलन होईल. महामंडळ त्याच्या नियोजनात सहभागी होईल. त्यासाठी महामंडळाचे सदस्य स्वखर्चाने जातील,' असे निवेदन पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने ३० जुलैला वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीस दिले. २४ जुलैला महामंडळाची बैठक झाल्यावर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलेले निवेदन पाहा ः "महामंडळातर्फे सॅन होजेला ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याऐवजी पहिले विश्‍व मराठी साहित्य संमेलन घेणार आहोत. हे संमेलन महामंडळाच्या घटनेनुसार आहे. ज्या वर्षी विश्‍व संमेलन असेल त्या वर्षी साहित्य संमेलन नसेल. सॅन होजेच्या संमेलनाला पन्नास मराठी साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येणार असून त्यांचा खर्च बे एरिया मंडळ करणार आहे.' ही दोन्ही निवेदने वाचली, की महामंडळाच्या मुखंडांनी चालवलेली दिशाभूल लक्षात येईल. यात महामंडळाचे पदाधिकारी खरे बोलत आहेत, की मसापचे पदाधिकारी? महामंडळाच्या औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांनी पहिल्यापासून काही घटनाबाह्य निर्णय घेतले आणि मसापच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आंधळेपणाने पाठिंबा दिला आहे. या दोन संस्थांच्या संगनमताबद्दल केवळ माध्यमांनीच शंका व्यक्त केली आहे असे नाही, तर महामंडळाच्या अन्य सदस्यांना गृहीत धरून औरंगाबाद व पुण्याच्या प्रतिनिधींनी परस्पर निर्णय घेण्यावर विदर्भ साहित्य संघाने लेखी आक्षेप नोंदवलेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बहुमताने, एकमताने नव्हे... सॅन होजे प्रकरणातील महामंडळाच्या खोटेपणाचे एक एक नमुने पाहूः सॅन होजेला साहित्य संमेलन घेण्यास विदर्भ साहित्य संघ, गोमंतक मराठी सेवक संघ, संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांनी विरोध केला होता. छत्तीसगड व मध्य प्रदेश येथील साहित्य संस्थांचाही विरोध होताच. पण बहुमताने सॅन होजेला मान्यता मिळाली होती. तरीही त्या बैठकीच्या इतिवृत्तात हा ठराव क्रमांक चार "सर्वानुमते संमत' असाच नोंदवलेला होता. सॅन होजेला संमेलन दिल्यानंतर आयत्यावेळी अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयात ठराव क्रमांक "९ब'द्वारे बे एरिया महाराष्ट्र मंडळाला संलग्नत्व देण्यात आले होते. मुळात संलग्नत्वाचा विषय असा आयत्या वेळी आणणे योग्य नव्हते. पण "एखाद्या संस्थेला संमेलन देण्यासाठी संलग्नतेची गरज नसते. त्यामुळे संलग्नता व संमेलन यांचा संबंध न जोडता प्रस्ताव मान्य करावा' असे महामंडळाच्या अध्यक्षांनी सदस्यांना सांगितले आणि सदस्यांनी घटनेचा विचार न करता माना डोलावल्या. घटनेचा विचार तुकड्यातुकड्यांनी करता येत नाही, त्यातील परस्पर संबंधित कलमांचा एकत्र विचार करावयाचा असतो. महामंडळाच्या घटनेच्या परिशिष्ट "अ'मधील संमेलनविषयक नियमानुसार संमेलनाची प्रायोजक संस्था संलग्न असण्याची गरज नाही हे खरे आहे. पण मुळात हे नियम घटनेच्या कलम ५ मधील घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांच्या अधिवेशनाकरिता तयार केलेले आहेत. या नियमांची उद्दिष्टे कलम ३ मधील उद्देशांप्रमाणे आहेत. म्हणजे महामंडळाशी संलग्न संस्थांच्या कार्यक्षेत्रात हे संमेलन व्हावयाला हवे अशी घटनेची पूर्वअट आहे. त्यामुळे सॅन होजेला संमेलन घेण्यासाठी तेथील संस्थेला संलग्नत्व देण्याची आवश्‍यकता होतीच. आळंदीला एमआयटीने संमेलन आयोजिलेले होते, पण ते घेण्यापूर्वी मसापची आळंदी येथे शाखा सुरू करण्यात आली होती, याची आठवण कर ून द्यावीशी वाटते. म्हणजे आपल्याला हवी ती कलमे तोडून तोडून स्वीकारायची आणि कार्यभाग उरकायचा ही महामंडळाची पद्धत दिसते. मसाप व मुंबईने पहिल्यांदा विदर्भाला साथ दिली नाही. पण त्यांच्या कायदा सल्लागारांनी त्यांची चूक लक्षात आणून देताच पुढच्या बैठकीत त्यांनी बे एरियाचे संलग्नत्व रद्द करण्याची मागणी करून चूक दुरुस्त केलेली दिसते. मात्र तरीही परदेशवारी टाळण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळेच त्यांनी हप्पाथप्पाचा खेळ पुणे - औरंगाबादचे भिडू घेऊन सुरू ठेवलेला दिसतो. मसापच्या निवेदनानुसार, शासकीय अनुदान मिळवण्यासाठी ८२ वे संमेलन योग्यवेळी म्हणजे २००९ मध्ये घेतले जाईल. मसापच्या मंडळींचे याबाबतचे ज्ञान कमी आहे असे म्हणावे, की सॅन होजेचे संमेलन होईपर्यंत येथे संमेलन होणार नाही या हमीची योग्य ती काळजी घेणारी जबाबदार (!) मंडळी म्हणावे हेच कळत नाही. सांगली येथील संमेलन २००७ - २००८ या आर्थिक वर्षात झाले होते. म्हणजे रत्नागिरीच्या डिसेंबर २००८ मध्ये होणाऱ्या संमेलनास मान्यता दिली गेली असती तरी २००८ - २००९ या वर्षाचे शासकीय अनुदान मिळण्यात अडचण आली नसतीच. उलट आता मार्च २००९ पर्यंत संमेलन घेतले गेले नाही, तर या वर्षीचे अनुदान बुडू शकते. पण मिळालेल्या माहितीनुसार, आपल्याला जे अनुदान मिळणार नाही, असे सांगितले जाते तेच अनुदान सॅन होजेकरिता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सॅन होजेतील संमेलनात बे एरियाला नफा झाला असता तर महामंडळाला वाटा मिळणार नाही, पण तोटा झाला तर महामंडळ त्यात सहभागी असेल असा करार करण्यात आला होता. महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या या कराराच्या वेळी घटक संस्थांना विचारात घेण्यात आले नव्हते. कोणत्याही संमेलनाचा कार्यक्रम, वक्ते याविषयी महामंडळ निर्णय घेते. पण हे संमेलन त्यालाही अपवाद आहे. बे एरियाला "ग्लॅमरस' वाटणाऱ्या लेखकांची यादी ते देणार आणि मग महामंडळाने त्यांना बोलवायचे, असे ठरले आहे. ५० लेखक आणि महामंडळाचे २० सदस्य यांना बे एरियातर्फे ही वारी घडवली जाणार आहे. या ७० जणांना फक्त आरोग्यविमा, भारतातील प्रवास, व्हिसासाठीचा खर्च स्वतः करावयाचा आहे. महामंडळाचे सदस्य आपल्या खर्चाने जाणार असे म्हणतात, तेव्हा हाच खर्च तर अपेक्षित नसेल? महामंडळ विश्‍व संमेलनाला मदत करणार म्हणजे नेमके काय करणार हे स्पष्ट झालेले नाही. सध्या तरी साहित्य संमेलनाला पर्यायी म्हणून हे संमेलन होणार असल्याने ते अजूनही घटनाबाह्यच आहे. पण येनकेनप्रकारेन रेटून नेण्याचा प्रयत्न महामंडळाचे पुण्या - औरंगाबादचे सदस्य करीत आहेत. या सगळ्या प्रकारात रत्नागिरीच्या नगर वाचन मंदिराच्या कार्यकर्त्यांची त्यांनी घोर निराशा केली आहे. त्यांना झुलवत ठेवून महामंडळाने तोंडघशी पाडले. आता एका संस्थेने केलेला कार्यक्रम एवढेच त्याचे स्वरूप राहील. एकीकडे आपल्या दुराग्रहांपायी घटनाबाह्यरीतीने, मराठी माणसांची मने दुखवून सॅन होजेला संमेलन घ्यायचे आणि दुसरीकडे शक्‍य असलेले व मराठी लोकांनाही हवे असलेले रत्नागिरीचे संमेलन दुर्लक्षायचे? मराठी वाचकांना, लेखकांना, प्रकाशकांना अवमानित करण्यात एका वर्षी हे मुखंड यशस्वी होतीलही, पण यात महामंडळाचे तुकडे होण्याचा आणि संमेलनाची परंपरा बंद पडण्याचा धोका आहे. मराठी माणसाला ते सहन होणारे नाही. प्रकाशकांना दुर्लक्षता येणार नाही महामंडळांच्या परदेशवारीविरूद्ध मराठी प्रकाशक परिषदेने न्यायालयात जायची तयारी केली होती, त्यामुळे महामंडळाच्या मुखंडांनी प्रकाशकांवर तोंडसुख घेतले आहे. महामंडळाच्या आताच्या वैभवशाली संमेलनाची गंगोत्री असलेल्या "मराठी ग्रंथकार सभे'चे पहिले अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे यांनी संमेलन व प्रकाशक यांचे नाते पहिल्या संमेलनापासून जोडले आहे. दरसाल पाच रुपयांचे ग्रंथ विकत घेण्याची हमी देणाऱ्यांना संमेलनात प्रवेश द्यावा असे त्यांनी सुचवले होते. साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनाला आता महत्त्व आलेले आहे. मात्र, संमेलनाच्या जोडीने ग्रंथ प्रदर्शन उभारण्याची प्रथा पस्तीस वर्षांपूर्वी सुरू झाली. कोल्हापूरच्या गुलमोहर बुक डेपोचे अरुण गाडगीळ यांनी ही प्रथा सुरू केली, हे किती जणांना आठवत असेल? -------------------------------------------------------- सांगलीच्या संमेलनातही खोटारडेपणा सांगलीत झालेल्या ८१ व्या संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याच्या तपशिलाबाबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून घटक संस्थांना पुरेशी माहिती देण्यात येत नव्हती. काही गोष्टी तोंडी सांगून इतिवृत्तात त्याचा समावेश करण्यात येत नव्हता, तर काही गोष्टी सांगितल्या त्यापेक्षा आयत्या वेळी वेगळ्याच करण्यात आल्या होत्या. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या या वागण्यामुळे त्या वेळचे मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना सूत्रे न देताच परत जावे लागले होते. महामंडळाचा हा खोटारडेपणा उघड करीत विदर्भ साहित्य संघाने नाराजी व्यक्त केली होती. -------------------------------------------------------- - संतोष शेणई

Saturday, August 9, 2008

What Purpose Would S.F.Sammelan Serve?

एकीकडे मराठी शाळांना , मराठी बोलण्याला उतरती कळ लागली असताना , साहित्य संमेलनाने मात्र थेट साता समुद्रापार झेप घेतली आहे. आगामी ८२ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोत घेण्याच्या महामंडळाने घेतलाय. ही मराठीची भव्य झेप म्हणायची की एक मराठीच्या नावाने टाकलेला आणखी एक नवा फार्स म्हणायचा ? रविवारी जाहीर झालेल्या या निर्णयाने साहित्यवर्तुळात चांगलीच राळ उठली आहे. साहित्य महामंडळाच्या १३१ वर्षांच्या इतिहासात परदेशात भरवण्यात येणारं हे पहिलं साहित्य संमेलन असणार आहे. ५२ वर्षांपूर्वी श्री.म. माटे यांनी मराठी साहित्य संमेलन परदेशामध्ये भरवण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे स्वप्न पूर्ण होणार याचा आनंद व्यक्त करायचा की राज्यातील रसिक या सोहळ्याला मुकणार म्हणून टीका करायची असा सावळागोंधळ सर्वत्र दिसतोय. अमेरिकेतील मराठी बांधवाना याचा आनंद झाला असला तरी भारतातून किती जणांना तेथे पोहचणे जमेल हा वाद तर दिवसेंदिवस अधिकच पेटणार आहे... त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक साहित्य रसिकांकडून याचे स्वागत होत असले तरी दुसरीकडे सामान्य माणसाला या संमेलनात सहभागी होता येणार नाही , असा नाराजीचा सूरही निघत आहे. साहित्यिक , आयोजनासाठी उत्सुक असलेल्या इतर संलग्न संस्थांकडून विरोध होत आहे. तर सान फ्रान्सिस्को येथे होणा-या संमेलनाला पर्यायी संमेलन आयोजित करता येईल का , अशीही चाचपणी सुरू झाली आहे. साहित्य संमेलन साता समुद्रापार जाणार याचा आपल्याला आनंद वाटतो का ? संमेलन अमेरिकत भरवण्यात आल्याने मराठी भाषेचा प्रसार होईल असे वाटते का ? दरवर्षी पंढरीच्या वारीप्रमाणे साहित्य संमेलनाला हजेरी लावणा-या साहित्य रसिकांची निराशा होईल का ? केवळ मूठभर साहित्यिक आणि महामंडाळाच्या पदाधिका-यांच्या परदेशवारीसाठी हे संमेलन अमेरिकेत भरवण्याचा निर्णय घेण्यात आला का ? तुम्हांला काय वाटते ? हे आम्हाला जरूर कळवा...

Sunday, August 3, 2008

( Vishwa Marathi ) Geet Sammelan

गीत संमेलन(बण्डा जोशी) एका गरीब कवीला- रेडिओवरची भाषिक गाणी ऐकत ऐकत झोप लागली. संमेलनाचे विचार आणि गाण्यांचे शब्द यांच्या भेळेचं त्याला एक स्वप्न पडलं. जागं झाल्यावर, त्याच्या अल्पमतीप्रमाणे आणि मंदबुद्धीनुसार, त्यानं दोन्ही बाजूंच्या स्वप्नातल्या भूमिका आठवून, गाण्यात खरडून टाकल्या. ........आटपाट राज्य होतं. त्या राज्याची एक "अमृताते पैजा जिंकणारी' भाषा होती. त्या भाषेची "लेकरं', काही देशी (तळ्यात) होती, तर काही विदेशी (मळ्यात). त्या भाषेचं, प्रतिवर्षी संमेलन व्हायचं. एका वर्षी ते विदेशी मळ्यात व्हावं, अशी टूम निघाली. त्या विदेशी मळ्याचं नाव होतं सॅन होजे. मळ्यात जायचं की इथल्या तळ्यात डुंबायचं, यावरून दोन तट पडले. काही जण तटाच्या भिंतीवर बसले. अशा स्थितीत तिथल्या एका गरीब कवीला- रेडिओवरची भाषिक गाणी ऐकत ऐकत झोप लागली. संमेलनाचे विचार आणि गाण्यांचे शब्द यांच्या भेळेचं त्याला एक स्वप्न पडलं. जागं झाल्यावर, त्याच्या अल्पमतीप्रमाणे आणि मंदबुद्धीनुसार, त्यानं दोन्ही बाजूंच्या स्वप्नातल्या भूमिका आठवून, गाण्यात खरडून टाकल्या. आता हे सगळं, काव्याच्या कैफात आणि स्वप्नांच्या गावात घडल्यामुळं, सारं "काल्पनिक' आहे, हे उघड आहे. पण यातली नावं, घटना, संस्था आणि व्यक्तींमध्ये साम्य आढळल्यास तो योगायोग न समजता, कवीचा मूर्खपणा समजावा आणि सोडून द्यावं; राग धरू नये. अनुराग असावा; कारण, कवीचा बाणा आहे- तोंडघशी पडलो तरी बेहत्तर, घ्यायची तर अस्मानउडीच! तशी संमेलनाची अस्मानउडी घ्यायचं ठरवलं- महामंडळानं. तेही अमेरिकेत- सॅन होजेला! तर "मधु'ची अस्वाभाविक "तऱ्हा' अशी की त्यांनी "मंगेशा'च्या "कर्णीकपाळी' रत्नागिरीचा हट्ट धरला. यावर महामंडळाच्या श्रेष्ठींनी विधानसभेत- नव्हे- "विभांसमेत' "जोशा'नं त्यांना विचारलं- (चाल- मधुमागसी माझ्या सख्या परी) ""मधु, मागसी "संमेलना'परी कुठे सॅन-होजे, कुठे रत्नागिरी? संधी कशी ही सोडू वाया पर्वणी आली, विदेशी जाया अता विरोधी सूर कासया "बे-एरियाची' करू वारी।। मधु, मागसी "संमेलना'परी कुठे सॅन होजे, कुठे रत्नागिरी?'' "सॅन-होजेमध्ये, सत्तर लेखकांची, प्रवास-निवास खाण्यापिण्याची व्यवस्था यजमान करणार,' असं ठरलं. पण याचं "कौतिक' जे विदेशी जाण्यासाठी "ठाले' त्यांना हो-! बाकीच्याना त्याचं काय? मग विघ्नसंतोषी पत्रकार कुत्सितपणे म्हणू लागले- (चाल- अशी पाखरे येती) ""असे लेखकु असती, बेटे, सदाच भांडत बसती।। परदेशातिल अंगत-पंगत, त्यास्तव करती कुस्ती।। संमेलनी त्या, तेच चालले "सत्तरा'मध्ये जे जे घुसले रात्री, नंतर, अधांतरी वर विमानाविना उडती।। असे लेखकु असती।। इकडं प्रकाशक मंडळींचं "अर्थपूर्ण' दुःख "सायडिंग'ला पडायला लागलं. मग त्यांनी, आपलं गाऱ्हाणं प्रकाशित केलं- (चाल - मला बी जत्रंला येऊ द्या की) संमेलन इथंच होऊन द्या की रं आम्हाला धंदा करून द्या की।। आम्हाला फायदा घेऊन द्या की रं नाही तर कोर्टात जाऊन्‌ द्या की।। मग, विश्‍व साहित्य संमेलन, सॅन होजेला ठरलं आणि महामंडळाच्या मानकऱ्यांकडं, नवेजुने लेखक आपली वर्णी लावायला लागले. यावर, वैतागून ते मानकरी एका लेखकाला म्हणाले- (चाल - काही बोलायचे आहे) तुला यावयाचे आहे, पण नेणार नाही। सत्तरांच्या यादीमध्ये, तुला घुसवणार नाही।। "त्यां'च्या कृपा"प्रसादाने' झालो दौऱ्याचा धनी तुझा वशिला लावाया, मला जमणार नाही।। सगळ्यांच्या नाकावर टिच्चून, मंडळी सॅन-होजेला निघाली. मग जाणारे, मागं राहणाऱ्यांना म्हणाले- (चाल - जन पळभर म्हणतिल हायहाय) तुम्ही म्हणत बसा रे हाय- हाय। अम्ही जातो, करतो, बाय बाय।। (तिथं काय होईल?) चर्चा झडतिल- कविही गातील, परिसंवादक चऱ्हाट वळतिल खाऊन- पिऊनी, डुलतिल सुलतिल, तोल सोडतिल हातपाय।। आम्ही जातो, करतो बाय बाय।। तिकडं, यजमान सॅन-होजेकर- "संदीप' घेऊन सगळी "देवकुळे' मंडळी, स्वागताला सिद्ध होती, संमेलन घ्यायला अधीर होती- उत्सुक होती. ती आपल्या भाषा-बांधवांना विनवू लागली- (चाल- फटका ससारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरु नको) "विश्‍वचि अपुले घर' मानी तू, उंबऱ्यामध्ये अडू नको "ज्ञानेशांचा' पाईक हो तू, आम्हास "परके' करु नको कूपमंडुकी वृत्ती सोडुन, ये बाहेरी, भिऊ नको विश्‍वाकाशी घेऊ भरारी, पंख आपले मिटू नको।। ओलांडुन ये, साती सागर, आता मागे हटू नको पुढे चाल रे, मागे राहुन, पाय कुणाचे ओढू नको।। भांडणतंटे करू नको (ती) परंपरा चालवू नको मायमराठी, विसरु नको जरि तू असशी "लोकल' तरिही, ग्लोबल' व्हाया डरु नको।। विश्‍वामधले सर्व मराठी एकी ठेवू, दुही नको।। खडे घाट चढून रत्नागिरीला जायचं, की सात समुद्र ओलांडून सॅन होजे गाठायचं, हा प्रश्‍न अनेक वाचक- साहित्यरसिकांना पडला. यावर, कवीनं "पाडगावकरी' शैलीत सांगितलं- (मूळ कविता- कसं जगायचं, तुम्हीच ठरवा) कसं जायचं, तुम्हीच ठरवा-! खेड घाट चढत, की विमानातनं उडत- तुम्हीच ठरवा! - आपल्यापैकी, ज्याना जमतं-परवडतं, तेच जातात- हे नेहमीचंच! मग यंदा, "आनंदयात्री' होणं, जमवायचं की, भाऊबंदकी करत, गमवायचं, तुम्हीच ठरवा। "माझंच खरं' असंही म्हणता येतं- "त्याचंही चूक नाही,' हेही जाणता येतं-! आता वाद पेटवायचे, की भेद मिटवायचे- तुम्हीच ठरवा-! कोकणात धडकायचं की सॅन होजेत फडकायचं- तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा! शेवटी, कवीनं ठरवलं- आधी गाठू रत्नागिरी नंतर नेलंच मंडळानं, तर करू सॅन-होजेचीही वारी! आणि टोचत होतं, तरी कवी कुंपणावर बसून राहिला. - बण्डा जोशीfunction CloseWindow() {window.close() }

Saahitya Sammelan In India In 2009

भारतातील संमेलन २००९ मध्ये होणारपुणे, ता. ३० - भारतातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही, तर योग्य वेळी म्हणजे २००९ मध्ये ते संमेलन घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे. शिवाय पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाचे सर्व सदस्य स्वखर्चाने जाणार असल्याचेही परिषदेच्या पत्रकात म्हटले आहे. परिषदेच्या भूमिकेविषयी विविध माध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. "मसाप'च्या पुण्याच्या, तसेच बाहेरगावच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत परिषदेचे विश्‍वस्त, उपाध्यक्ष, पदाधिकारी, बाहेरगावचे प्रतिनिधी उपस्थित होते. महामंडळाच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती या प्रसंगी प्रतिनिधींना देण्यात आली. अमेरिकेत होणारे विश्‍वसंमेलन हे अमेरिकेतील मराठी भाषक भरवीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ त्याच्या नियोजनात सहभागी होत आहे. मराठीचा झेंडा ते देशाबाहेर मिरवीत असल्याने मराठी भाषक म्हणून "मसाप'चे सदस्य व पदाधिकारी महामंडळाच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना या संमेलनासाठी पाठिंबा देत आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. या संमेलनासाठी महामंडळाचे सर्व सदस्य स्वखर्चाने जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी "मसाप'ला दिलेल्या पत्रातही याला दुजोरा दिला आहे. ""संमेलन प्रामुख्याने मराठी रसिकांसाठी असल्याने ते महाराष्ट्रातीलच एका गावी भरविले जाण्यास अग्रक्रम द्यावा, तथापि सॅनफ्रान्सिस्को येथील मराठी बांधवांनी यासंबंधी दाखवलेला उत्साह आणि कळकळ ध्यानी घेऊन तेही निमंत्रण स्वीकारावे. महाराष्ट्रातील संमेलन हे अधिकृत ८२ वे संमेलन होईल आणि अमेरिकेतील संमेलनास "विशेष साहित्य संमेलन' म्हणावे, म्हणजे हा वाद मिटू शकेल. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही सूचना विचार करण्याजोगी आहे, असे म्हटले आणि महामंडळाच्या आगामी बैठकीत काही दुरुस्त्यांसह ती ठेवतो, असे म्हटले. नुकतीच महामंडळाची बैठक झाली आणि महाराष्ट्रातील संमेलनाचा अग्रक्रम मान्य करून ते २००८ ऐवजी २००९ मध्ये घ्यावे, असे म्हटले; कारण २००८ मध्ये सांगली येथे संमेलन होऊन गेले आहे. शासकीय आर्थिक वर्ष २००९ च्या मार्चमध्ये संपेल. त्यानंतर हे संमेलन भरल्यास या संमेलनास योग्य ते शासकीय आर्थिक अनुदान मिळू शकेल,'' असे मिरासदार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. "विश्‍व साहित्य संमेलन' म्हणावे! ""सॅन होजे येथील मराठी मंडळींना हे संमेलन येत्या फेब्रुवारीमध्ये आवश्‍यक वाटते, म्हणून ते फेब्रुवारीस ठरवावे. ते तेथील मराठी मंडळाने भरवावे. मराठी साहित्य महामंडळाने फक्त त्यांना योग्य ते सहकार्य करावे. या संमेलनास "विश्‍व साहित्य संमेलन' म्हणावे, म्हणजे घटनात्मक कुठलीही अडचण येणार नाही. मंडळाचे जे सदस्य या विश्‍व संमेलनास जातील, त्यांनी स्वखर्चाने जावे, असेही ठरले आहे,'' असा उल्लेखही मिरासदार यांनी पाठविलेल्या पत्रात आहे.

Wednesday, July 30, 2008

Saahitya Mahaamandalaache Maalak,Sammelanaache Thekedaar


महामंडळाचे मालक, संमेलनाचे ठेकेदार

(संतोष शेणई) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गेल्या महिन्याभरातील कोलांटउड्यांचा खेळ घृणास्पद आणि उबग आणणारा आहे. ........अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सॅन होजे येथे ८२ वे मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय मागे घेतला आणि त्याऐवजी त्याच काळात "विश्‍व मराठी साहित्य संमेलन' घेण्याचा घटनाबाह्य निर्णय घेतला. मराठी साहित्य रसिकांचा क्षोभ दूर करण्यासाठी सॅन होजेतील ८२ वे साहित्य संमेलन रद्द करण्यात आल्याचे वाटेल; पण प्रत्यक्षात महामंडळाने केलेली ही फसवणूक आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गेल्या महिन्याभरातील कोलांटउड्यांचा खेळ घृणास्पद आणि उबग आणणारा आहे. अमेरिकेतील बे एरिया महाराष्ट्र मंडळाला संलग्नत्व देण्याचा प्रस्ताव महामंडळापुढे २४ मेच्या बैठकीत पहिल्यांदा आला. त्याच वेळी विदर्भ साहित्य संघाने महामंडळाच्या घटनेतील तरतुदींनुसार त्या संस्थेला संलग्नत्व देता येणार नाही हे दाखवून दिले. त्यामुळे त्या वेळी संलग्नत्व देण्यात आलेले नव्हते; पण विदर्भाच्या गैरहजेरीत व गोमंतक मराठी सेवक संघाचा विरोध डावलून २२ जूनच्या बैठकीत सॅन होजेला संमेलन घेण्याचे बहुमताने ठरविण्यात आले. संमेलन घेण्याचे ठरवल्यानंतर आयत्या वेळच्या विषयात बे एरिया मंडळाला संलग्न करण्यात आले. संलग्न नसलेल्या मंडळाला संमेलन द्यायचे आणि नंतर घटनाबाह्य असतानाही त्या संस्थेला संलग्न करून घ्यायचे ही मनमानी झाली; पण महामंडळात ती केली गेली. मलमपट्टीचा प्रयत्न महामंडळाच्या निर्णयाला मराठी साहित्य रसिकांनी प्रचंड विरोध दर्शवल्यावर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर मलमपट्टी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. रत्नागिरी येथे संमेलन घेण्याचा निर्णय त्यातूनच जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात रत्नागिरीचे संमेलन होऊ द्यायचे नाही, हे या कंपनीने आधीच ठरवले होते. फक्त रसिकांचा क्षोभ कमी करण्यासाठी ही हूल दाखवली गेली. आताही सॅन होजेचे "अखिल भारतीय' संमेलन रद्द करण्यात आले, तेही कायदेशीर मुद्दे पुढे आल्यामुळे. बे एरियाच्या संलग्नत्वाबद्दल विदर्भाने जे २४ मेच्या बैठकीत सांगितले होते, तेच पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने आणि मुंबई साहित्य संघाने २४ जुलैच्या बैठकीत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मांडले. महामंडळाच्या घटनेत स्पष्ट म्हटले आहे, की भारताबाहेरच्या संस्थेला संलग्नत्व द्यायचे झाल्यास ती त्या पूर्ण देशाची प्रतिनिधित्व करणारी संस्था असली पाहिजे. तसेच त्या संस्थेने मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याविषयी सातत्याने काम केलेले असले पाहिजे. या दोन्ही अटी बे एरिया मंडळ पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे केवळ कौतिकराव ठालेपाटील व अरुण प्रभुणे यांची इच्छापूर्ती करण्यासाठी संलग्नत्व देता येत नव्हते. ही गोष्ट विदर्भाने आणि गोव्याने लक्षात आणून देऊनही महिन्याभराने "मसाप' व मुंबई यांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? असे काय घडले, की त्यांना घटनेतील तरतुदींचा वेगळा अर्थ उमगला, की घटनेतील तरतुदी लक्षात घेण्यासाठी नसतातच. आपण काहीही मनमानी करणे हा आपला हक्कच आहे, असे त्यांना वाटले? एक मुद्दा असाही मांडण्यात येत होता, की मराठी साहित्य जागतिक पातळीवर पोचणार असेल तर घटनेतील काही नियमांकडे थोडे दुर्लक्ष झाले तर काय बिघडले? घटना आपल्यासाठीच असते ना! हा मुद्दा वेगवेगळ्या संदर्भात कोणी ना कोणी विचारत असतो. "घटना ही कारभार चालवण्यासाठी असते, मोडून पाडण्यासाठी नाही.' नाथ पै यांचे विधान नेहमीच नीट लक्षात ठेवल्यास बऱ्याच गोष्टी सुरळीत चालू शकतील, एवढेच येथे या महाभागाना सांगेन. या प्रकरणात पुण्याच्या मसापच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद राहिली. ज्या प्रकरणाची दोन महिने चर्चा सुरू आहे, जी धोरणात्मक बाब ठरू शकते, त्याबाबत "मसाप'च्या कार्यकारिणीचा कौल घ्यावा, असे पदाधिकाऱ्यांना वाटले नाही. दैनंदिन कामकाजाबाबत येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी दर मंगळवारी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माहिती देणे एवढेच या विषयाचे गांभीर्य वाटले. परिषदेचे अध्यक्ष द. मा. मिरासदार यांनी वृत्तपत्रातून जाहीर नाराजी व्यक्त केली. परिषदेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉ. वि. मा. बाचल यांनी नाराजीने राजीनामा देऊ केला होता. त्या वेळी या पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपली तेथे गरज आहे, असे त्यांना विनवावे लागले. परिषदेच्या विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांनी महामंडळाच्या घटनेतील तरतुदी अभ्यासून मसापला सल्ला दिला होता; पण महामंडळाच्या बैठकीत मसापच्या पदाधिकाऱ्यांनी हा सल्ला काय आहे हे सांगण्यास आढेवेढे घेतले. गोव्याच्या प्रतिनिधीने "मसाप'ने कायदेशीर सल्ला घेतला आहे, तो वाचावा असे म्हटल्यावरही पहिल्यांदा वेगळेच पत्र वाचून दाखवले गेले. त्यानंतर पुन्हा कायदेशीर सल्ला काय, असे विचारल्यावर नाइलाज असल्यासारखे ऍड. आव्हाड यांचे मत वाचून दाखवण्यात आले. बे एरियाला संलग्नत्व देता येणार नाही, याची माहिती मसापच्या प्रतिनिधींना अगोदरपासून असतानाही ते सॅम होजे येथील संमेलनाचा कार्यक्रम ठरवण्याच्या बैठकीत उत्साहाने सामील झाले. या सगळ्याचा अर्थ काय होतो? मालकशाही कधी संपणार? महामंडळ जगात कुठेही मराठी साहित्य व भाषाविषयक कार्यक्रम करू शकते, या घटनात्मक तरतुदीच्या आधारे विश्‍व संमेलनाची घोषणा झाली; पण त्यानंतर लगेचच अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. आता प्रश्‍न निर्माण होईल की विश्‍व संमेलनाला घटनात्मक पाया निर्माण करण्यात आला का? निवडणूक नियमावली कधी करण्यात आली? त्याला महामंडळाची मान्यता कधी मिळवली? परदेशवारीची एवढी घाई असावी का, की घटना बाजूला सारून कार्यक्षमता दाखवावी? रत्नागिरीच्या संमेलनाची घोषणा घाईघाईने केली गेली होती; पण सॅन होजेचे संमेलन झाल्याखेरीज दुसरे कुठलेही संमेलन घेतले जाणार नाही, अशी हमी महामंडळाने दिली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या संमेलनाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जाणार हे त्या घोषणेच्या वेळीच नक्की होते. आताही पहिले विश्‍व संमेलन होईल, पण ८२ वे साहित्य संमेलन कोठे व कधी होणार, हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत. साहित्य संमेलन हे महामंडळाचे वार्षिक अधिवेशन असते. त्यामुळेच विश्‍व संमेलनाची पळवाटही घटनाबाह्य आहे. तरीही विश्‍व संमेलन होईल त्या वर्षी साहित्य संमेलन होणार नाही अशी घोषणा हेकेखोरपणाने करण्यात आली आहेच. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची ही मालकशाही कधी बंद होणार? ---------------------------------------------------------- कायदा मोडून लोकशाही टिकत नाही. घटना तोडून संस्था टिकत नाही. - बॅ. नाथ पै ---------------------------------------------------------- - संतोष शेणईfunction CloseWindow() {window.close() }

Monday, July 28, 2008

Saahitya Melaavaa In San Francisco ....?

संमेलन की मेळावा?
28 Jul 2008, 0008 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा


विश्व साहित्य संमेलन होणारच अशी स्पष्ट चिन्हे दिसत असतानाच रत्नागिरी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य शारदा संमेलन भरवण्याचा झालेला निर्णय हा साहित्यवर्तुळामध्ये वावरणा-यांचा विवेक जागा असल्याचीच ग्वाही देणारा आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम प्रतिभावंत कवी मंगेश पाडगावकर यांची निवड करण्यात आली आहे आणि ती अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल आम्ही शारदा संमलेनाच्या आयोजकांचे अभिनंदन करतो. याचे कारण असे की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या होणा-या निवडणुकीमध्ये पडायचे नाही, असे काही ज्येष्ठ प्रतिभावंतांनी नक्की केले आहे. त्यामुळेच श्री. ना. पेंडसे आणि विजय तेंडुलकर यांना हा मान त्यांच्या हयातीत मिळाला नाही आणि विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांनाही तो देण्याचे कोणी आजवर मनावर घेतले नाही. शारदा संमेलनाच्या आयोजकांनी मात्र ही उणीव भरून काढली आहे. पाडगांवकरांची निवड करून आपण संमेलनच भरवणार नाही, तर ते अर्थपूर्णही करणार, असेच जणू त्यांनी सूचित केले आहे. रत्नागिरीतील संयोजक असा विवेक दाखवत असतानाच अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांना मात्र विवेक सोडून गेला असावा. याचे कारण काहीही करून सॅन होजे येथे संमेलन घ्यायचेच अशा निर्धारानेच ते वागत आणि बोलत आहेत.

ज्या रीतीने त्यांनी बे एरियाच्या मंडळाला संलग्नता दिली आणि टीका होताच ती रद्द करून आता तिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाऐवजी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवण्याचे ठरविले, त्यावरून विवेकहिन माणसासारखीच महामंडळाची स्थिती झाल्याचे दिसते. या सगळ्या गोंधळामध्ये यंदा अधिकृत असे अ. भा. मराठी साहित्य संमेलन इथे होणारच नाही, असे चित्र आता तयार झाले आहे आणि ते कोणाही साहित्यप्रेमीच्या जिव्हारी लागणारे आहे. मराठी साहित्य संमेलनाला एक प्रदीर्घ अशी अभिमानास्पद परंपरा आहे. एकेकाळी मराठी साहित्य व्यवहारातील लेखक-कवींनी, प्रकाशकांनी-वाचकांनी, साहित्याच्या अभ्यासकांनी-जाणकार समीक्षकांनी एकत्र येऊन जाहीरपणे विचारविनिमय करण्याचे ठिकाण असे या संमेलनाचे रूप होते. त्या वेळी अध्यक्षीय भाषणे कसदार आणि विचारपरीप्लुत असत आणि धनदांडग्यांच्या किंवा राजकारण्यांच्या आशीर्वादाची फारशी गरज तेव्हा भासत नसे. काळाच्या ओघात त्यामध्ये फरक पडत गेला. आता तर ही उरलीसुरली परंपराच मोडीत काढण्याचे अचाट धाडस अखिल भारतीय साहित्य महामंडळ दाखवत आहे. या धाडसातून अमेरिकेमध्ये काही साहित्यिक एकत्र येतील. अमेरिकेतून आणि अन्य ठिकाणांहूनही काही रसिक तिथे जमतील.

मात्र ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नसेल, तर तो एक साहित्य मेळावा असेल. एक दीर्घ परंपरा मोडून आयोजित केलेल्या या मेळाव्याने काही लोकांची चारजणांना एकत्र करण्याची हौस फिटेल. काहींना साहित्यिकांना भेटल्याने कृतकृत्यही वाटेल. काहीना त्यांच्या सहवासाने स्वर्ग लाभल्याचाही भास होईल. तर काहींना, आपण आपले स्वप्न अखेरीस साकार केलेच याचा आनंद होईल. त्यांच्या आनंदामध्ये आम्ही मिठाचा खडा टाकू इच्छित नाही. मात्र या मेळाव्याला अ. भा. मराठी साहित्य संमेलन म्हणता येणार नाही. उलट असे संमेलन भरवण्याच्या परंपरेला छेद देणारी घटना अशीच या साहित्यमेळ्याची नोंद इतिहासात होईल. मराठी रसिकांच्या सामूहिक इच्छाशक्तीला धाब्यावर बसवून होणाऱ्या या मेळाव्यामुळे अ. भा. मराठी साहित्य संमेलनच रद्द होऊ नये, अशीच रसिकांची इच्छा आहे. तसे करणे हा मराठी सरस्वतीउपासकांचा अपमान ठरेल.

या बातमीवर तुमचं मत मांडण्यासाठी इथे क्लिक करा.

Saturday, July 26, 2008

Shaaradaa Saahitya Sammelan To Be Held At Ratnaagiri

रत्नागिरीत डिसेंबरमध्ये "मराठी साहित्य शारदा संमेलन'

रत्नागिरी, ता. २५ - अखिल भारतीय साहित्य महामंडळाने विश्‍व साहित्य संमेलन जाहीर केल्याने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने येत्या २६ ते २८ डिसेंबरदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य शारदा संमेलनाची घोषणा अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केली.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे नाव घोषित होईल, असेही त्यांनी नमूद केले.

वाचनालयात ऍड. पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली. कविवर्य मंगेश पाडगावकर यांना सन्मानपूर्वक अध्यक्षपद देण्याची सूचना प्राचार्य राम शेवाळकर यांनी केली. त्यानुसार श्री. पाडगावकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे पटवर्धन यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी सांगितले.

यंदा वाचनालयाने चांगल्या आर्थिक तरतुदीमुळे साहित्य संमेलनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने पाहणी केली; मात्र सॅन फ्रान्सिस्को येथे संमेलनाची घोषणा झाली. त्यामुळे साहित्य क्षेत्रात वादळ उठले होते.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने वाचकांच्या, साहित्यिकांच्या भावना पायदळी तुडवून सॅन फ्रान्सिस्कोला संमेलनाचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे; मात्र जिल्हा वाचनालयाने या भावना लक्षात घेऊन साहित्य शारदा संमेलन घेण्याचे ठरविले आहे. प्रकाशक परिषदेनेही या संमेलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला असून अनेकांचा सहभाग येथे लाभणार आहे, असे ऍड. पटवर्धन म्हणाले.

साहित्य महामंडळाने आपल्याला डावलले नसल्याचे ऍड. पटवर्धन यांनी ठामपणे सांगितले. सॅन फ्रान्सिस्को येथे विश्‍व संमेलनाची घोषणा करून महामंडळाने मनमानी कारभार केला आहे. यंदा संमेलन न होता विश्‍व संमेलन होणार असल्याने व ठाणे, परभणी येथे संमेलन होत नसल्याने संमेलनात डावलण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ भांडवलदारांनी संमेलन "हायजॅक' केल्याची टीका ऍड. पटवर्धन यांनी केली.

डिसेंबरमधील साहित्य शारदा संमेलनात सर्व साहित्यिक आणि प्रत्येक सांस्कृतिक संस्थेला सहभागी करून घेतला जाणार आहे.
निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव
सॅन फ्रान्सिस्को येथे विश्‍व मराठी साहित्य संमेलन होत असल्यामुळे त्या संमेलनासाठी शासनाकडून अनुदान मिळेल की नाही? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. हा निधी अखिल भारतीय संमेलनासाठी असतो, त्यामुळे विश्‍व संमेलनाला दिला जाण्याबाबत शक्‍यता कमी आहे. त्यामुळे येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या संमेलनासाठी निधी मिळावा, असा प्रस्ताव वाचनालयातर्फे शासनाकडे येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे.

Aapali Bhintach Paaryaachi--Poetry Collection Released In Mumbai

CAPTION FOR THE PICTURES
kavayitri maadhuri maate yaanchyaa aapali bhintach paaryaachi yaa kaavyasangrahacha prakaashan khyaatnaam kavi vindaa karandikar yaanchyaa haste nuktach mumbait jhaala.

*********************************************************************************************************************
kaavyasangraha prakaashan.jpg

(Size 56.21 KB) Download Attachment

Scan For Virus with F-Securekaavyasangraha cover.jpg

(Size 527.32 KB) Download Attachment

Scan For Virus with F-Secure

Upgradation Of Saahitya Sammelan(Sakaal News)

स्वरूप आणि दर्जा वाढला - संदीप देवकुळे
विद्याधर कुलकर्णी - सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २५ - ""अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रूपांतर "विश्‍व मराठी संमेलना'मध्ये झाल्यामुळे त्याचे स्वरूप आणि दर्जा वाढला आहे.
कोणालाही न दुखावता मराठी भाषा आणि साहित्याचे श्रेष्ठत्व जगाला दाखवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,'' असा विश्‍वास बे-एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकुळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

देवकुळे म्हणाले, ""साहित्य महामंडळाने हे संमेलन सॅन होजे येथे घेण्याचे निश्‍चित झाल्यावर आलेल्या प्रतिक्रियांसंदर्भात आम्ही जागरूक होतो. संमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी महामंडळाच्या निमंत्रणावरून भारतात आल्यावर या संमेलनासंदर्भात आक्षेप असणाऱ्या सर्वांशी चर्चा केली. दुसऱ्या दिवशीच्या बैठकीस महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे भेटण्याच्या उद्देशातून उपस्थित होतो. आमच्या मंडळाविषयीची माहिती देणे एवढेच त्यामागचे प्रयोजन होते. माझे निवेदन संपल्यानंतर मी तेथून बाहेर पडलो. महामंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला स्वारस्य नव्हते. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना भूमिका समजावून सांगितली. या संमेलनाच्या यशासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. रत्नागिरीच्या जिल्हा वाचनालयाचे दीपक पटवर्धन, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी प्रकाशक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. संमेलनाच्या यशस्वितेसाठी आम्हाला साहित्यविश्‍वाचा आशीर्वाद हवा आहे.''

संमेलनाच्या तयारीबाबत माहिती देताना देवकुळे म्हणाले, ""सॅन होजे कन्व्हेन्शन सेंटर आणि इंडियन कम्युनिटी सेंटर यासह आणखी दोन ठिकाणांची संमेलन स्थळाच्या दृष्टीने पाहणी केली आहे. महाराष्ट्र आणि भारतातील किमान एक हजार मराठी भाषक आणि जगभरातील एक हजार मराठी जाणणारे या संमेलनाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या संमेलनास अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहावे, यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंतचे "ट्रॅव्हल पॅकेज' देण्याची योजना आहे.''

-------------------------------
"अनुदानाबाबत नंतर निर्णय'
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. सॅन होजे येथील संमेलनाला सरकारने यापूर्वीच आशीर्वाद दिला आहे. आता "विश्‍व मराठी संमेलन' असे स्वरूप झाल्यामुळे सरकारशी बोलावे लागेल. मात्र, सरकारचे अनुदान घ्यायचे की नाही, याचा निर्णय आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलूनच निश्‍चित करण्यात येईल, असे देवकुळे यांनी सांगितले.
-------------------------------

Friday, July 25, 2008

Tokyo Marathi Mandal Supports Muktangan In Pune(Sakaal Clip)

टोकियोतील मराठी मंडळाची पुण्यातील "मुक्तांगण मित्र' संस्थेला मदत
पुणे, ता २३ - टोकियोतील मराठी मंडळाने पुण्यातील "मुक्तांगण मित्र ' या संस्थेला १००००० येनची (सुमारे ३८००० रुपये) देणगी दिली आहे.

टोकियो मराठी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत अत्रे यांनी "मुक्तांगण मित्र' चे संस्थापक अनिल अवचट यांच्याकडे देणगी सुपूर्त केली.

१९९६ मध्ये स्थापन झालेल्या टोकियो मराठी मंडळाने आत्तापर्यंत जपानमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले आहेत. या कार्यक्रमांचे आयोजन करताना प्रेक्षकांकडून प्रवेश वर्गणी स्वरुपात गोळा झालेल्या रकमेतून खर्च वजा जाता उरलेली रक्कम साठवली जाते. या साठवलेल्या रकमेतून यंदा "मुक्तांगण मित्र' ला देणगी देण्यात आली.

दर वर्षी निरनिराळ्या संस्थांना अशा स्वरुपाची मदत करण्याची इच्छा असल्याचे अत्रे यांनी सांगितले.

Election Of President For Vishwa Marathi Saahitya Sammelan(Maharashtra Times)

संमेलनाध्यक्ष निवडणार २४ जण!
25 Jul 2008, 0024 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा

- संजीव उन्हाळे । औरंगाबाद

' विश्व मराठी साहित्य संमेलना'चा अध्यक्ष निवडण्याची घटनात्मक तरतूद महामंडळाकडे नसल्यामुळे यावषीर् संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार नाही.' अशी घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी गुरुवारी केली!

महामंडळाचे १९ सदस्य व संयोजन समितीचे पाच सदस्य अशा एकंदर २४ मतांचा कानोसा घेऊन संमेलनाध्यक्ष निवडला जाईल, हेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रत्नागिरीच्या संमेलनाबद्दल, 'तेथील संयोजकांनी 'नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच आम्हाला साहित्य संमेलन घेता येणे शक्य आहे', असे सांगितले होते. एकंदर विश्व साहित्य संमेलनाची मोठी तयारी करायची असल्यामुळे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये महामंडळाला अखिल भारतीय साहित्य संमेलन घेता येणे शक्य नाही. त्यामुळे हे संमेलन होणार नाही' असा युक्तिवाद ठाले-पाटील यांनी मांडला.

कोकण मराठी साहित्य परिषदेने पर्यायी महामंडळ स्थापन करण्याचे ठरवल्याबद्दल विचारले असता ठाले यांनी निराळेच उत्तर दिले! ते म्हणाले: कोमसापने आमच्याकडे 'किमान आम्हाला संलग्न संस्था म्हणून तरी मान्यता द्या' असा विनंतीअर्ज केला आहे. कोमसापला घटकसंस्था म्हणताच येत नाही. केवळ चार संस्थापक संस्थाच घटकसंस्था असल्याने, त्यांचे अधिकार कोमसापला मागताच येत नाहीत; त्यामुळे कोमसापचा तो अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे विचारार्थ पाठवण्यात आला आहे.

' रत्नागिरीत साहित्य संमेलन भरवण्याबद्दल बैठकीत काहीच चर्चा झाली नाही. अमेरिकेतल्या संमेलनाचीच चर्चा झाली. तेवढीच चर्चा व्हावी, असा प्रकार सुरू होता. दोन्ही ठिकाणी संमेलने होणार, तर चर्चाही दोन्हीची हवी, असे आमचे मत असूनदेखील आम्हाला गृहीत धरण्यात आले' असे कारण या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, उपाध्यक्ष श्रीपाद जोशी, सदस्य शोभा उबगडे यांचा यांचा समावेश बैठकीबाहेर पडणाऱ्यांत होता. मात्र, आमच्या कृतीला 'सभात्याग' वा 'बहिष्कार' समजू नये, असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

.....

Now It's Vishwa Marathi Sammelan !(Maharashtra TImes)

सॅनफ्रान्सिस्कोत 'विश्व संमेलन'
25 Jul 2008, 0024 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा

औरंगाबाद

' ८३ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाऐवजी आता 'पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन' सॅनफ्रान्सिस्कोतील बे एरियामध्ये १४, १५ व १६ फेब्रुवारी २००९ रोजी होणार आहे' अशी घोषणा गुरुवारी सायंकाळी करतानाच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रत्नागिरीत संमेलन होणारच नाही, असा सोक्षमोक्ष लावला.

' अखिल भारतीय' ऐवजी 'विश्व' साहित्य संमेलनामुळे 'मराठी साहित्याची एक नवी परंपरा निर्माण होणार' तसेच 'महामंडळाच्या या निर्णयाशी विदर्भ साहित्य मंडळसुद्धा सहमत आहे' असा दावा ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

तत्पूवीर् रत्नागिरीत होणाऱ्या संमेलनाबद्दल महामंडळाच्या बैठकीत चर्चाच न झाल्याच्या निषेधार्थ विदर्भ साहित्य मंडळ पदाधिकाऱ्यांनी महामंडळाच्या बैठकीतून तावातावाने 'बहिर्गमन' केले.

Wednesday, July 23, 2008

S.F.Saahitya Sammelan In feb.(Sakaal & Maharashtra Times)

औरंगाबाद ,
मटा ऑनलाइन वृत्त

साहित्य संमेलन नक्की कुठे होणार या वादावर अखेरचा पडदा टाकत ते सातासमुद्रापार सॅन फ्रान्सिस्कोमध्येच भरवण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले. कोकणात रत्नागिरीत संमेलन होणार की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये , यावर बरेच वादविवाद झाले खरे , पण आता मात्र अमेरिकावारी करायचे नक्की ठरले आहे. या संमेलनासाठी मुहूर्त शोधण्यात आलाय तो ‘ वॅलेंटाईन डे ’ चा.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आज औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत संमेलनाच्या तारखा व कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली. १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान बे एरियात तीन दिवस मराठी सारस्वतांची जत्रा भरणार आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीवर विदर्भ साहित्य संघाने बहिष्कार टाकला होता. या बैठकीत सॅन फ्रान्सिस्को येथे होणा-या कार्यक्रमाची पत्रिका तयार करण्याचे काम होते , तसेच अनपेक्षितपणे बे एरियाचे तीन प्रतिनिधी या बैठकीला हजर राहिले. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचे विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी जोशी यांनी नमूद केले.
************औरंगाबाद ,
मटा ऑनलाइन वृत्त

साहित्य संमेलन नक्की कुठे होणार या वादावर अखेरचा पडदा टाकत ते सातासमुद्रापार सॅन फ्रान्सिस्कोमध्येच भरवण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले. कोकणात रत्नागिरीत संमेलन होणार की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये , यावर बरेच वादविवाद झाले खरे , पण आता मात्र अमेरिकावारी करायचे नक्की ठरले आहे. या संमेलनासाठी मुहूर्त शोधण्यात आलाय तो ‘ वॅलेंटाईन डे ’ चा.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आज औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत संमेलनाच्या तारखा व कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली. १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान बे एरियात तीन दिवस मराठी सारस्वतांची जत्रा भरणार आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीवर विदर्भ साहित्य संघाने बहिष्कार टाकला होता. या बैठकीत सॅन फ्रान्सिस्को येथे होणा-या कार्यक्रमाची पत्रिका तयार करण्याचे काम होते , तसेच अनपेक्षितपणे बे एरियाचे तीन प्रतिनिधी या बैठकीला हजर राहिले. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचे विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी जोशी यांनी नमूद केले.
************************************************************************

Moves For New Marathi Saahitya Mahamandal(Sakaal News)

पर्यायी साहित्य महामंडळाचे रणशिंग फुंकले - मधू मंगेश कर्णिक

मुंबई, ता. १९ - "अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा'चा कारभार हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा झाला असून महामंडळावर लुंग्यासुंग्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
मूठभर लोकांच्या मर्जीखातर साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्कोला घेणारच असाल, तर तुमची ही दादागिरी मोडून काढू, असा घणाघाती हल्ला चढवीत ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी आज साहित्य महामंडळाला अखेरचे आवाहन करीत पर्यायी साहित्य महामंडळाचे रणशिंग फुंकले.

साहित्य महामंडळाच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा करण्यासाठी आज दादर येथील अण्णासाहेब वर्तक सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद, जागतिक मराठी परिषद, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मराठी प्रकाशक संघटनेतर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ""साहित्य संस्कृतीची श्रीमंती वाढविण्यासाठी देशातील सर्व साहित्य संस्था, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, महत्त्वाची ग्रंथालये आदी सर्व घटकांना महामंडळामध्ये सामील करून घ्यावे व त्यानुसार आवश्‍यक ती घटनादुरुस्ती करावी,'' असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.

या बैठकीत साहित्य महामंडळाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित वक्‍त्यांनी सडकून टीका केली. मधू मंगेश कर्णिक म्हणाले की, ""एखाद्या पतपेढीच्या निवडणुकीची चर्चा व्हावी, तशी साहित्य संमेलनाची चर्चा होणे मराठी साहित्य क्षेत्राला शोभादायक नाही. साहित्यरसिक, प्रसारमाध्यमांचा दबाव वाढला म्हणूनच आता रत्नागिरीतही संमेलन घेण्यावाचून महामंडळाला पर्याय राहिलेला नाही. साहित्य संमेलन ही मराठी सारस्वतांची दिवाळी आहे. हा सण आमच्या घरातच व्हायला पाहिजे, वाटल्यास त्यानंतर अमेरिकेत एखादा साहित्य सोहळा घेण्यास आमची हरकत नाही.''

रामदास फुटाणे यांनी सांगितले की, अमेरिकेतील संमेलनाला माझा विरोध नाही; पण तसेच संमेलन रत्नागिरीतही व्हावे. नवीन महामंडळ स्थापन करण्याच्या भानगडीत कुणीही पडू नये, असा सल्ला त्यांनी दिला. सुभाष भेंडे यांनी हे संमेलन घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. फाडफाड इंग्रजी शिकण्यासारखेच तीन दिवसांत मराठी शिका, असे सांगणारे हे संमेलन असल्याची खिल्ली त्यांनी उडवली. अरुण साधू यांनी संमेलनातील राजकारण्यांच्या सहभागाविषयी टीकेची झोड उठविली. काही राजकारणी सर्जनशील असतात, हे मान्य केले तरी साहित्यिकांनीही आपला कणा मोडू देऊ नये, आपल्याच मस्तीत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी अर्जुन डांगळे, पु. द. कोडोलीकर, विजय चोरमारे, अशोक मुळ्ये, कृष्णकांत शिंदे यांचीही भाषणे झाली.
--------------------------------------------------------
"महामंडळाची घटना कालबाह्य'
महामंडळाची पन्नास-साठ वर्षांपूर्वीची घटना आता कालबाह्य झाली आहे. तिचा प्रवाह जुनाट झाला आहे. महामंडळाचा कारभार अधिक स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा शहाणपणा सुचेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत मधू मंगेश कर्णिक यांनी साहित्यरसिकांना गावकुसाबाहेर ठेवण्याचा, साहित्यिकांत दुभंगलेपणा आणण्याचा अनुचित विचार करणाऱ्यांना नवीन पिढी फेकून देईल, असा इशारा दिला.
--------------------------------------------------------

Sunday, July 20, 2008

European Marathi Meet Gets Underway In Paris

पॅरीसमध्ये सातव्या युरोपियन मराठी संमेलनाचे दिमाखदार उद्धाटन...
१८ जुलै २००८
अभय पाटील
जगभरातला मराठी माणूस शाश्‍वत विकासाच्या पालखीचा भोई होईल असा आशावाद प्राज उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सातव्या युरोपियन मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषणात व्यक्त केला.
आर्थिक विकास आणि सामाजिक स्वास्थ्य यांचा सुवर्णमध्य गाठण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे केवळ नफ्याच्या भाषेत उद्योगधंदे आपले यश मोजू शकणार नाहीत, तर नफा, पर्यावरण आणि समाज (profit, planet and people) या तीन निकषांवर उद्योगधंद्याचे व्यवस्थापन व्हायला हवे असे ते म्हणाले.
पॅरीसजवळ जुई आँ जोझासमधील पुरातन शातोमध्ये दीप प्रज्वलन आणि गणेशपूजा करून सातवे मराठी युरोपियन संमेलन सुरू झाले. पहिल्या सत्रात जर्मनीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का गोखले, निषाद फाटक आणि अक्षय जोशी यांनी मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. सतरा परदेशी भाषा अस्खलित बोलणाऱ्या मुंबईच्या अमृता जोशीची मुलाखत सर्वांनाच चक्रावून टाकणारी होती.
संध्याकाळच्या सत्रात डॉ. मोहन आगाशेंनी श्रोत्यांशी संवाद साधला. मनोरंजनाची भूल देऊन शिक्षणाची शस्त्रक्रिया करण्याचं तंत्र आपण राबवतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. परदेशातल्या मराठी रसिकांसमोर नव्या दमाची मराठी नाटकं आणण्याचा आपला प्रयत्न आहे, समन्वयचं "साठेचं काय करायचं' हा प्रयोग या उद्देशानंच युरोपियन मराठी मंडळींसमोर आणत आहोत असं ते म्हणाले.
राजीव नाईक लिखीत, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि अमृता सुभाष आणि निखिल रत्नपारखी अभिनीत नाटकाच्या प्रयोगानं संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

Saturday, July 19, 2008

Marathi Films Festival (Sakaal News Item)

मराठी चित्रपटांची मॉरिशसवर स्वारी

मुंबई, ता. १८ - चौकटीबाहेर पडू पाहणाऱ्या मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय भरारी घेतली असून पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव यंदा राज्य सरकारने मॉरिशस येथे आयोजित केला आहे. या महोत्सवासाठी मॉरिशस सरकारचे विशेष सहकार्य मिळणार आहे.
२५ जुलैपासून मॉरिशसमध्ये सुरू होणाऱ्या या पाच दिवसांच्या महोत्सवात गेल्या तीन वर्षांतील पारितोषिकप्राप्त चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. डोंबिवली फास्ट, काय द्याचं बोला, खबरदार, नितळ, रेस्टॉरन्ट, सावली, टिंग्या, चेकमेट, एवढंसं आभाळ, शेवरी; तसेच सरकारी अनुदानित सेनानी साने गुरुजी आणि वासुदेव बळवंत फडके हे ऐतिहासिक व्यक्तींवरील गाजलेले चित्रपट दाखविले जाणार आहेत. मराठी चित्रपटांचा मागोवा घेणारे चर्चासत्र, मराठी चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन यावर व्याख्याने होणार आहेत.

या महोत्सावात मंगेश हाडवळे, संजय जाधव, अंकुश चौधरी, बिपिन नाडकर्णी, अशोक शिंदे, सुमित्रा भावे, रिमा लागू, संदीप कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, महेश कोठारे, अजिंक्‍य देव, किशोर कदम, नीना कुलकर्णी, अजय सरपोतदार सहभागी होणार आहेत.

Thursday, July 17, 2008

Whole-hearted Kautik Of This~n~That....!(Maharashtra Times)

...
काय तुझे उपकार...

अरबी तटापासून पॅसिफिक तटापर्यंत

मराठी साहित्य संमेलन नेल्याबद्दल

मराठी साहित्य परिषदेचे 'कौतिक'।।

सॅन फ्रान्सिस्कोला संमेलन भरवण्यासाठी

मतदान केलेल्या सर्व सभासदांचे मन:पूर्वक 'कौतिक'।।

सॅन फ्रान्सिस्कोला संमेलन भरवण्याचे ठरवून

अखिल 'भारतीयाला' अखिल 'विश्व' संमेलनाचा

दर्जा प्राप्त करविल्याबद्दल 'कौतिक'।।

सॅन फ्रान्सिस्कोला संमेलन भरवण्यास 'काय हरकत'

या मतप्रवाहाचेही 'कौतिक'।।

सॅन फ्रान्सिस्कोची निवड करून जगातील शहरात

दुबई, सिंगापूर, हवाईबेट इत्यादी शहरांचा

मार्ग मोकळा केल्याबद्दल 'कौतिक'।।

सॅन फ्रान्सिस्कोला उदघाटनासाठी बुश/ओबामाला

आमंत्रित करून समईच्या ज्योती 'अणुऊर्जापासून'

पेटवण्याच्या कल्पकतेचे 'कौतिक'।।

भारतीय क्रिकेट मंडळाप्रमाणे मराठी साहित्य परिषदेला

श्रीमंत बनवण्याचा घाट घातल्याबद्दल 'कौतिक'।।

भारतीय रसिकजन/ साहित्यिक/ कवी/ प्रकाशन

गेले नाही तरी इंग्रजाळलेल्या मराठीत

मराठीचा जय घोष केल्याबद्दल 'कौतिक'।।

सतिश गोवर्धन, ठाणे.

Wednesday, July 16, 2008

Saahitya Sammelanacha Multifaceted Kavitva....

contraversies and social activities go hand in hand,they say,but this time a major cotraversial decision by akhil bharatiya marathi saahitya mahamandal-the apex body in marathi litreary institutes has resulted in major shocks after the mahamandal gave nod to an invite from bay area maharashtra mandal in san francisco to organise the next akhil bharatiya marathi saahity a sammelan in america.
while the bay area mandal is fully determined to host the next sammelan,the protest voices back home in india from promonent literateurs to publishers and common people besides media are gathering momentum day by day.
former presidents of marathi saahitya sammelan prof. gangadhar gadgil,prof.k.j.purohit,prof.subhash bhende and prof .ram shevalkar unequivocally registered their protest against the mahamandal's decision to hold the next marathi literary meet in united states.the general resentment is due to deprivation of common people from attending the saahitya sammelan if an overseas venue was opted for ,they said.renowned poet vinda karandikar came out with rather sarcastic remark saying,let the sammelan be held at south pole ,instead of bay area; so that it will attract even more people.
publishers in maharashtra .including ashok kothavale and anil mehta also expressed strong reluctance to accepting decision of saahitya mahamandal in both letters and spirit.it was not feasible to carry huge loads of books to any venue aall the way to any venue in america from hereas it was a gigantic task.publishers could not afford to gamble without any financial assurance,said mehta,addind that it was a stupid decision to accept invite from bay area mandal.the decision was made to favour only a chosen few for a joy tour of america,he said.
not withstanding all that criticism and intense protest voices,the bay area mandal is jubilant to have received an opportunity to host akhil bharatiya saahitya sammelan,coinciding with the silver jubilee of the host organisation.the atmosphere is vibrant,the mood is festive and the response-encouraging,observed sandeep deokule,president ,bay ares maharashtra mandal,who has passed many a hurdles from bylanes of byculla all the way to bay area,san francisco.we are all preparing for celebrations that are associated with the literary meet,he said.the sammelan would be highly helpful in bridging gaps and start a new era in literary stream as well as socio-cultural fields,he said.
a senior journalist in pune,who is also an enthusiast in literature asserted that the mahamandal better devote its energy and manpower in preservation and upliftment of both written and spoken marathi at home,which was facing huge deterioration especially when it came to masses.accepting the invite from bay area mandal was a welcome decision ,but needed a practically logical consideration,he said ,adding,a domestic venue would enable masses to connect with themainstream of literature in addition to their interaction with their favourite writers and poets.massive sales of books amounting to a few crore rupees was itself a practical selfexplainatory factor.if an overseas venue was accepted,all that will be missed,he pointed out.an opportunity for the bay area mandal to have a special marathi literary meet would certainly be a practical way out,which will enable the mahamandal to have the regular akhil bharatiya saahitya sammelan at a suitable venue in india,he added.
dr.d.v.nene,a literature enthusiast in baroda said,the mahamandal had ample scope to improve the status of marathi at home.the apex body should come out with a planned strategy for betterment of marathi in maharashtra and rest if the states in india,he said.let the organisations in maharashtra and other states in india get chances to host akhil bharatiya marathi saahitya sammelan,the turn for brihanmaharshtra mandals in europe and america may follow in the future,he added.
in stark contrast to the heavy opposition and strong protests audible allover literary world back home in india,united states based marathi businessman,writer and president of advisory board for brihanmaharshtra mandalof north america,shreeniwas thanedar was too optimistic about the forthcoming akhil bharatiya marathi saahitya sammelan slated to be held in san francisco in february next year.he expressed immense pleasure over the mahamandal's decision to organise the next sammelen in united states.marathi speaking people allover north america would be more than happy to welcome the mainstream writers and poets besides critics in marathi and organising the sammelan in states would provide a boost to the cultural,linguistic and social movements of marathi people here,he prodly observed.the new generation of marathi speaking population ain america and canada will ,sure,be glad to be exposed to the currents and undercurrents as well as progress of marathi literature,thanedar said.
electrnic and print media based in maharahtra came out fully in support of providing outlet to general anguish from promonrent figures as well as the common people.star majhaa and ibn marathi television channels conducted opinion polls separately,with a common feature of a huge no -no to an american venue for the next saahitya sammelan.
new jersey based neelima and ravi kulkarni categorically opposed an american venue for the next marathi literary meet,saying,masses back home will be deprived of the opportunity to attend and enjoy the sammelan if an overseas venue was opted for,because of financial reasons.the marathi speaking population ahd a golden opportunity to attend b.m.m.conventions in america,and despite of that if some marathijan in north america wished,they can go the venue of saahitya sammelan anywhere in india ,the kulkarnis pointed out.oslo based arvind phatak also registered his strong opposition for a venue in the united states for the saahitya sammelan ,as it would deprieve thosands and thosands of saahityapremis from attending the sammelan.let the sammelan continue to be mass based affair,he stated.

Tuesday, July 15, 2008

G.Thakar Opposes Bay Area Saahitya Sammelan--News-clip.

Differences in Bay Area --Saahitya Sammelan--Maharashtra Times.

संमेलन आयोजनासाठी... बे एरियातच मतमतांतरे
26 Jun 2008, 0032 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा

- हारिस शेख

सॅन फ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन घ्यावे की घेऊ नये, याबाबत बे एरियात राहणाऱ्या मराठी भाषकांमध्ये मत मतांतरे व्यक्त केली जात आहेत. बे एरिया महाराष्ट्र मंडळाने संमेलनासाठी आतापासूनच तयारी सुरू केली असली तरी याच भागात राहणाऱ्या मराठीजनांनी नाहक कोट्यवधी रुपये खर्चून सॅन फ्रान्सिस्कोत संमेलन कशाला, असाही सूर 'मटा' ऑनलाइनला पाठवलेल्या ई-पत्रात लावला आहे. लॉस एन्जलिसमधील अनिल भोसले म्हणतात की, मूठभर लोकांसाठी हा प्रचंड खर्च करणे निव्वळ मूर्खपणा ठरेल. त्यापेक्षा महाराष्ट्रात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत केल्यास संमेलनाचा मोठेपणा दिसेल.

न्यू जर्सी इथून दीपक लिहितात, अमेरिकेत मराठी साहित्य संमेलन होत असल्याबद्दल एनआरआय म्हणून मला आनंद होईल, पण संमेलन म्हणजे मूठभर मराठी एनआरआयसाठी 'शो ऑफ' ठरू नये. संमेलनावर पैसे न उधळता ते योग्य ठिकाणी वापरावेत.बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या कार्यपध्दतीवर नाराज मराठीजनांपैकी सॅन फ्रान्सिस्कोतील संदीप सन्नीवळेकर लिहितात, हे संमेलन म्हणजे बे एरिया महाराष्ट्र मंडळाचा हट्ट आहे. गेल्या वषीर्पर्यत हे मंडळ वेगवेगळ्या वादांमध्ये अडकले होते. यावषीर् रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणता म्हणता वादावर पडदा पडला. जळगावचा रहिवासी असलेला आणि सध्या सॅन होजे विद्यापीठाचा विद्याथीर् अनिल मगरे याने संमेलनाबद्दल आनंद व्यक्त केला. येथे मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी संमेलन उपयोगी ठरेल, असे त्याला वाटते.

बे एरियातून योगेश नाईक लिहितो : आम्ही तरुण मंडळी संमेलनाची वाट पाहत आहोत. अमेरिका, कॅनडा व अन्य देशांमधून हजारो मराठीप्रेमी येणार आहेत. यामुळे इथले तरुण लेखक, कवींना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळेल. ठाण्यात किंवा रत्नागिरीत संमेलन झाले असते तरी विरोध झालाच असता. सर्वसामान्यांना वादात रस नसतो. हा विरोध न्यूनगंडातून होत असतो. साहित्य महामंडळाने दरवर्षी दोन साहित्य संमेलने आयोजित करावीत. अखिल भारतीय संमेलन भारतात, तर जागतिक मराठी संमेलन परदेशात व्हायला हवे. त्यामुळे वाद होणारच नाही, असे न्यू जसीर्च्या सी. व्ही. डोंगरे यांचे मत आहे.

या बातमीवरच्या एकूण प्रतिक्रिया (5) वाचा अन्य वाचकांच्या प्रतिक्रिया आणि तुमची प्रतिक्रिया लिहा.

Monday, July 14, 2008

Letter from aai to sandeep in Bay Area on Saahitya Sammelan--Maha.Times news--item.

सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत दुमदुमणारी मराठी साहित्य संमेलनाची दुंदुभी आता
चागलीच निनादू लागली आहे . या दिग्विजयाची मटानिवासी चकोराने आपल्या
उपरोधिक आणि काल्पनिक लेखणीने केलेली जम्माडीगंमत ...

.........................................

बे एरियातील संदीपने जाहीर केलं की आम्ही येथील मराठी श्रीमंत नाही ,
मध्यमवगीर्य आहोत . हे वाचून संदीपच्या आईने त्याला तातडीने मेल पाठवला .
तो असा :

चि . संदीप यास ,

अनेक आशीर्वाद

तुझी आथिर्क स्थिती ठीक नाही हे ' मटा ' वाचून कळलं . वाईट वाटलं .
म्हणजे आम्हाला हे पेपरातून कळावं याचं . आम्ही इतके वेळा तिकडे आलो ; पण
तू कधी याची आम्हाला कल्पनाही येणार नाही याची काळजी घेतलीस . लहानपणचा
तुझा स्वभाव गेला नाही , हेच खरं .

आता यापुढे येताना आम्हाला अधिक विचार करावा लागेल . कारण आमचा भार
तुझ्यावर पडणं आम्हाला योग्य वाटत नाही . तुमचा भलामोठा बंगला बघून
तुमच्या परिस्थितीची कल्पना येत नाही . बंगल्यात तुमच्या स्विमींग टँक ,
टेनिस कोर्ट , दोन मोटारी वगैरे बघून आम्हाला तुम्ही अंबानीच आहात असं
वाटलं होतं . गेला बाजार डीएसके वगैरे तरी .

आता तू साहित्य संमेलन भरवण्यात पुढाकार घेणार आहेस असं कळलं . काळजीच
वाटायला लागली आहे . इतक्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं तुला परवडणार आहे
का ? त्यात या काही लेखक मंडळींच्या सवयी ऐकून आहे मी . त्या भारी जातील
तुला . तू आपला वरणभात जेवणारे लेखक तुझ्या घरी ठेवून घे . त्या
संयोजकांना म्हणावं बाकीच्यांची इतरांकडे सोय करा .

आता मला कळलं की सुनबाईला सगळी कामं स्वत : घरी का करावी लागतात हे !
तिला म्हणावं माहेरी पोळी भाजी करायला आणि कुकर लावायला शिकली असतीस तर
तुझे पोटाचे हाल कमी झाले असते . नेहमी नेहमी बाहेर बर्गर आणि कोक बरा
नव्हे . पोटाला आणि खिशाला .

तिच्या बाळंतपणासाठी मी यायचं की नाही याचा आता मला विचार करायला हवा .
उगीच तुझ्यावर आथिर्क भार नको . आधी आम्ही दोघेही येणार होतो .
आमच्यावरील खर्चापेक्षा तिकडे नोकरांवरील खर्च कमी असेल ना ! तसं असेल तर
खुश्शाल नोकर ठेवा .

हे म्हणतात की आता अमेरिकेत वाईट स्थिती आहे . संयोजकांना म्हणावं संमेलन
थोडं पुढे ढकला . उगीच दुष्काळात तेरावा महिना अशी गत व्हायची .

मी आले तरी येताना चितळेंची बाकरवडी आणि आंबा बर्फी नेहमीपेक्षा जास्त
आणेन . तितकंच बाहेरचं खाणं टळेल . सुनेला म्हणावं , निदान बाळासाठी तरी
किचनमध्ये लक्ष घाल .

तुझी आई .

- चकोर

Saturday, July 12, 2008

saahitya mahamandalaavar thaakarenchi tikaa(news item from maha.times.)

कौतिकराव ठालेंना बाळासाहेबांचे टोले!
7 Jul 2008, 1248 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा

मुंबई,
मटा ऑनलाइन वृत्त

साहित्यसम्राट कौतिकराव ठाले-पाटलांनी ८२ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेसोबतच रत्नागिरीतही घेण्याची घोषणा केली आहे. पण त्यापैकी कुठल्या संमेलनावर ८२ व्या संमेलनाचा शिक्का बसणार ? अमेरिकेतल्या की रत्नागिरीतल्या ? आणि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कुणाला घोड्यावर बसवणार ?, असे खोचक विचारणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ' सामना ' मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात त्यांनी साहित्य महामंडळांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे.

' ठाले पाटलांच्या कसरती ' या शीर्षकाखालील अग्रलेखाच्या सुरुवातीलाच बाळासाहेबांनी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना टार्गेट केलंय. एकही पुस्तक न लिहिलेले साहित्य सम्राट, असंच त्यांनी त्यांचं वर्णन केलंय. कौतिकरावांचं अंतःकरण किती मोठं ? अमेरिकेबरोबरच सामान्य रसिकांसाठी त्यांनी रत्नागिरीत पर्यायी पण अधिकृत साहित्य संमेलन घेण्याची घोषणा केली. पण, आता प्रश्न असा निर्माण झालाय की, ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शिक्का कोणत्या संमेलनावर मारायचा ? अमेरिकेत होणारे संमेलन ८२ वं की रत्नागिरीत होणारं संमेलन ८२ वं ? असा बिनतोड सवाल शिवसेनाप्रमुखांनी केलाय. डाव्यांचा अमेरिकाविरोध लक्षात घेऊन ' उगाच पंगा नको ' म्हणूनच अमेरिकेबरोबर रत्नागिरीतही संमेलन घेण्याचं महामंडळानं ठरवलं असावं, अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे.

दोन साहित्य संमेलनं होणार, मग अध्यक्ष अमेरिकेतल्या व्यासपीठावरून भाषण ठोकणार की रत्नागिरीत येऊन त्यांच्या जबरदस्त विचारांची पिचकारी मारणार ? , असा प्रश्न करत बाळासाहेबांनी एकूण साहित्य संमेलनावरच हल्ला चढवलाय. एकाच वेळी दोन साहित्य संमेलनांना हजेरी लावण्याचा चमत्कार कसा होईल ? अशा प्रकारचा चमत्कार घडवण्याची उदी किंवा अंगारा ठाले-पाटलांकडे असेल तर त्यांना तो अध्यक्षांना पुरवावा लागेल, असं म्हणत ते पुन्हा कौतिकरावांवर घसरले आहेत.

सेनेचा केंद्रबिदू मराठीच !
बाळासाहेबांनी या अग्रलेखात मराठी भाषा, मराठी माणूस या मुद्यांनाही स्पर्श केलाय. मराठी हाच आमच्या विचारांचा केंद्रबिंदू राहिलाय आणि राहील. मराठी भाषेचं वैभव टिकवायचं असेल तर मराठी माणूस टिकला पाहिजे. मराठी माणूस मनाने आणि पैशानेही श्रीमंत झाला की भाषेलाही समृद्धी येईल. आज मराठी पुस्तकांची हजार-पंधराशे प्रतींची आवृत्ती संपवताना प्रकाशकांची दमछाक होते. अशावेळी साहित्य संमेलन अमेरिकेत गेल्यानं काय फरक पडणार आहे ? दुसरे पु.ल. होणे नाही, दुसरे कुसुमाग्रज होणे नाही, पण नवे रसरशीत काही निर्माण होणार की नाही ?, असा रोखठोक सवालही त्यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांना इशारा
साहित्य संमेलन अमेरिकेत होणार हे कळताच, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याला पाठिंबाच दिला नाही, तर सढळ हस्ते मदतही केली. हेच औदार्य त्यांनी रत्नागिरीतल्या संमेलनाला दाखवलं नाही तर वाचकांना आवाज उठवावा लागेल, असंही बाळासाहेबांनी ठणकावलं आहे.

Sunday, July 6, 2008

Saahitya Sammelan

pune,july 03--the contraversial decision of akhil bharatiya marathi saahitya mahamandal to accept invite from bay area maharashtra mandal in america to host the next akhil bharatiya marathi saahitya sammelan (all india marathi literary meet) in san francisco received a further major jolt today,following strong opposition to the very decision from marathi speaking people residing out of india.

this was evident from the results of an opinion poll conducted exclusively through cross-section of marathi community abroad by Sunil Belhe,freelance journalist and director of pune based chinmay communications.the sample survey was conducted via internet through marathi community in rest of asia,africa,australia,europe and north america.

majority of poll participants (88 %) voiced protest against the mahamandal's decision,while only a minority(12 %) favoured the decision.interestingly,the most intense opposition (almost 90 %) to the decision favouring an american venue for marathi saahitya sammelan was recorded by participants from north america,some of whom ,compared the sammelan with ".pandharpur vaari".

in a remarkable response,neelima and ravi kulkarni from new jersey categorically opposed the choice of an american venue for theupcoming saahitya sammelan,saying,it was an unaffordable affair for the common people in maharashtra to attend the literary meet in the united states.arvind phatak,currently working in oslo was highly critical about the mahamandal's decision and stated that organising the marathi literary convention in america would lead to deprivation of masses from attending the saahitya sammelan.
*******************************************************************************************************

---------- Forwarded message ----------From: Neelima Kulkarni <neelimakulkarni@yahoo.com>Date: Jul 1, 2008 5:13 PMSubject: sahitaya sammelan - vote NO for san franscicoTo: sunilbelhe@gmail.com
Sunil,
Ravi and Neelima Kulkarni vote NO for sammelan in san francisco.
- Neelima and Ravi

I forwarded your email to several of my friends.
with my comments:
My reaction is as follows, I would like to know yours.
The fact is most of the Marathi writers and "Sahitya premi" cannot afford to come for sammelan here,
I don't think we should deprive them of Sammelan just because we want to enjoy it.
Most of us can afford a trip to India if we really want to participate in Sammelan.
Secondly,
San Francisco does not need a economic boost from Sammelan while any town in Maharashtra can use it.
In my opinion, we should not have "sahitya sammelan" here in the US. (we can have our own in the BMM convention - if we really want! ) *---------- Forwarded message ----------From: Phatak <raphatak@hotmail.com>Date: Jul 2, 2008 11:12 AMSubject: RE: Opinion Poll On Sahitya Sammelan Venue....To: sunilbelhe@gmail.com
NO.

By holding the Sammelan outside India, you deprive thousands who do not have the necessary finance from attending.

Outside Maharashtra, the knowledge about Marathi literature is limited to no more than 10% of the first generation migrants. Of that number, people who actively contribute to Marathi literature must be less than 100.

Sahitya Sammelan should be a celebration for those who are active in creative work and those who love reading it.

Unless Bay area is willing to sponser 1000 airtickets and stay expense for Marathi writers, they should not be allowed to disappoint the majority.

Arvind Phatak
Norway
+4792097175

Saahitya Sammelan


pune,july 03--the contraversial decision of akhil bharatiya marathi saahitya mahamandal to accept invite from bay area maharashtra mandal in america to host the next akhil bharatiya marathi saahitya sammelan (all india marathi literary meet) in san francisco received a further major jolt today,following strong opposition to the very decision from marathi speaking people residing out of india.

this was evident from the results of an opinion poll conducted exclusively through cross-section of marathi community abroad by Sunil Belhe,freelance journalist and director of pune based chinmay communications.the sample survey was conducted via internet through marathi community in rest of asia,africa,australia,europe and north america.

majority of poll participants (88 %) voiced protest against the mahamandal's decision,while only a minority(12 %) favoured the decision.interestingly,the most intense opposition (almost 90 %) to the decision favouring an american venue for marathi saahitya sammelan was recorded by participants from north america,some of whom ,compared the sammelan with ".pandharpur vaari".

in a remarkable response,neelima and ravi kulkarni from new jersey categorically opposed the choice of an american venue for theupcoming saahitya sammelan,saying,it was an unaffordable affair for the common people in maharashtra to attend the literary meet in the united states.arvind phatak,currently working in oslo was highly critical about the mahamandal's decision and stated that organising the marathi literary convention in america would lead to deprivation of masses from attending the saahitya sammelan.
*******************************************************************************************************

---------- Forwarded message ----------From: Neelima Kulkarni <neelimakulkarni@yahoo.com>Date: Jul 1, 2008 5:13 PMSubject: sahitaya sammelan - vote NO for san franscicoTo: sunilbelhe@gmail.com
Sunil,
Ravi and Neelima Kulkarni vote NO for sammelan in san francisco.
- Neelima and Ravi

I forwarded your email to several of my friends.
with my comments:
My reaction is as follows, I would like to know yours.
The fact is most of the Marathi writers and "Sahitya premi" cannot afford to come for sammelan here,
I don't think we should deprive them of Sammelan just because we want to enjoy it.
Most of us can afford a trip to India if we really want to participate in Sammelan.
Secondly,
San Francisco does not need a economic boost from Sammelan while any town in Maharashtra can use it.
In my opinion, we should not have "sahitya sammelan" here in the US. (we can have our own in the BMM convention - if we really want! ) *---------- Forwarded message ----------From: Phatak <raphatak@hotmail.com>Date: Jul 2, 2008 11:12 AMSubject: RE: Opinion Poll On Sahitya Sammelan Venue....To: sunilbelhe@gmail.com
NO.

By holding the Sammelan outside India, you deprive thousands who do not have the necessary finance from attending.

Outside Maharashtra, the knowledge about Marathi literature is limited to no more than 10% of the first generation migrants. Of that number, people who actively contribute to Marathi literature must be less than 100.

Sahitya Sammelan should be a celebration for those who are active in creative work and those who love reading it.

Unless Bay area is willing to sponser 1000 airtickets and stay expense for Marathi writers, they should not be allowed to disappoint the majority.

Arvind Phatak
Norway
+4792097175