Sunday, August 3, 2008

( Vishwa Marathi ) Geet Sammelan

गीत संमेलन(बण्डा जोशी) एका गरीब कवीला- रेडिओवरची भाषिक गाणी ऐकत ऐकत झोप लागली. संमेलनाचे विचार आणि गाण्यांचे शब्द यांच्या भेळेचं त्याला एक स्वप्न पडलं. जागं झाल्यावर, त्याच्या अल्पमतीप्रमाणे आणि मंदबुद्धीनुसार, त्यानं दोन्ही बाजूंच्या स्वप्नातल्या भूमिका आठवून, गाण्यात खरडून टाकल्या. ........आटपाट राज्य होतं. त्या राज्याची एक "अमृताते पैजा जिंकणारी' भाषा होती. त्या भाषेची "लेकरं', काही देशी (तळ्यात) होती, तर काही विदेशी (मळ्यात). त्या भाषेचं, प्रतिवर्षी संमेलन व्हायचं. एका वर्षी ते विदेशी मळ्यात व्हावं, अशी टूम निघाली. त्या विदेशी मळ्याचं नाव होतं सॅन होजे. मळ्यात जायचं की इथल्या तळ्यात डुंबायचं, यावरून दोन तट पडले. काही जण तटाच्या भिंतीवर बसले. अशा स्थितीत तिथल्या एका गरीब कवीला- रेडिओवरची भाषिक गाणी ऐकत ऐकत झोप लागली. संमेलनाचे विचार आणि गाण्यांचे शब्द यांच्या भेळेचं त्याला एक स्वप्न पडलं. जागं झाल्यावर, त्याच्या अल्पमतीप्रमाणे आणि मंदबुद्धीनुसार, त्यानं दोन्ही बाजूंच्या स्वप्नातल्या भूमिका आठवून, गाण्यात खरडून टाकल्या. आता हे सगळं, काव्याच्या कैफात आणि स्वप्नांच्या गावात घडल्यामुळं, सारं "काल्पनिक' आहे, हे उघड आहे. पण यातली नावं, घटना, संस्था आणि व्यक्तींमध्ये साम्य आढळल्यास तो योगायोग न समजता, कवीचा मूर्खपणा समजावा आणि सोडून द्यावं; राग धरू नये. अनुराग असावा; कारण, कवीचा बाणा आहे- तोंडघशी पडलो तरी बेहत्तर, घ्यायची तर अस्मानउडीच! तशी संमेलनाची अस्मानउडी घ्यायचं ठरवलं- महामंडळानं. तेही अमेरिकेत- सॅन होजेला! तर "मधु'ची अस्वाभाविक "तऱ्हा' अशी की त्यांनी "मंगेशा'च्या "कर्णीकपाळी' रत्नागिरीचा हट्ट धरला. यावर महामंडळाच्या श्रेष्ठींनी विधानसभेत- नव्हे- "विभांसमेत' "जोशा'नं त्यांना विचारलं- (चाल- मधुमागसी माझ्या सख्या परी) ""मधु, मागसी "संमेलना'परी कुठे सॅन-होजे, कुठे रत्नागिरी? संधी कशी ही सोडू वाया पर्वणी आली, विदेशी जाया अता विरोधी सूर कासया "बे-एरियाची' करू वारी।। मधु, मागसी "संमेलना'परी कुठे सॅन होजे, कुठे रत्नागिरी?'' "सॅन-होजेमध्ये, सत्तर लेखकांची, प्रवास-निवास खाण्यापिण्याची व्यवस्था यजमान करणार,' असं ठरलं. पण याचं "कौतिक' जे विदेशी जाण्यासाठी "ठाले' त्यांना हो-! बाकीच्याना त्याचं काय? मग विघ्नसंतोषी पत्रकार कुत्सितपणे म्हणू लागले- (चाल- अशी पाखरे येती) ""असे लेखकु असती, बेटे, सदाच भांडत बसती।। परदेशातिल अंगत-पंगत, त्यास्तव करती कुस्ती।। संमेलनी त्या, तेच चालले "सत्तरा'मध्ये जे जे घुसले रात्री, नंतर, अधांतरी वर विमानाविना उडती।। असे लेखकु असती।। इकडं प्रकाशक मंडळींचं "अर्थपूर्ण' दुःख "सायडिंग'ला पडायला लागलं. मग त्यांनी, आपलं गाऱ्हाणं प्रकाशित केलं- (चाल - मला बी जत्रंला येऊ द्या की) संमेलन इथंच होऊन द्या की रं आम्हाला धंदा करून द्या की।। आम्हाला फायदा घेऊन द्या की रं नाही तर कोर्टात जाऊन्‌ द्या की।। मग, विश्‍व साहित्य संमेलन, सॅन होजेला ठरलं आणि महामंडळाच्या मानकऱ्यांकडं, नवेजुने लेखक आपली वर्णी लावायला लागले. यावर, वैतागून ते मानकरी एका लेखकाला म्हणाले- (चाल - काही बोलायचे आहे) तुला यावयाचे आहे, पण नेणार नाही। सत्तरांच्या यादीमध्ये, तुला घुसवणार नाही।। "त्यां'च्या कृपा"प्रसादाने' झालो दौऱ्याचा धनी तुझा वशिला लावाया, मला जमणार नाही।। सगळ्यांच्या नाकावर टिच्चून, मंडळी सॅन-होजेला निघाली. मग जाणारे, मागं राहणाऱ्यांना म्हणाले- (चाल - जन पळभर म्हणतिल हायहाय) तुम्ही म्हणत बसा रे हाय- हाय। अम्ही जातो, करतो, बाय बाय।। (तिथं काय होईल?) चर्चा झडतिल- कविही गातील, परिसंवादक चऱ्हाट वळतिल खाऊन- पिऊनी, डुलतिल सुलतिल, तोल सोडतिल हातपाय।। आम्ही जातो, करतो बाय बाय।। तिकडं, यजमान सॅन-होजेकर- "संदीप' घेऊन सगळी "देवकुळे' मंडळी, स्वागताला सिद्ध होती, संमेलन घ्यायला अधीर होती- उत्सुक होती. ती आपल्या भाषा-बांधवांना विनवू लागली- (चाल- फटका ससारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरु नको) "विश्‍वचि अपुले घर' मानी तू, उंबऱ्यामध्ये अडू नको "ज्ञानेशांचा' पाईक हो तू, आम्हास "परके' करु नको कूपमंडुकी वृत्ती सोडुन, ये बाहेरी, भिऊ नको विश्‍वाकाशी घेऊ भरारी, पंख आपले मिटू नको।। ओलांडुन ये, साती सागर, आता मागे हटू नको पुढे चाल रे, मागे राहुन, पाय कुणाचे ओढू नको।। भांडणतंटे करू नको (ती) परंपरा चालवू नको मायमराठी, विसरु नको जरि तू असशी "लोकल' तरिही, ग्लोबल' व्हाया डरु नको।। विश्‍वामधले सर्व मराठी एकी ठेवू, दुही नको।। खडे घाट चढून रत्नागिरीला जायचं, की सात समुद्र ओलांडून सॅन होजे गाठायचं, हा प्रश्‍न अनेक वाचक- साहित्यरसिकांना पडला. यावर, कवीनं "पाडगावकरी' शैलीत सांगितलं- (मूळ कविता- कसं जगायचं, तुम्हीच ठरवा) कसं जायचं, तुम्हीच ठरवा-! खेड घाट चढत, की विमानातनं उडत- तुम्हीच ठरवा! - आपल्यापैकी, ज्याना जमतं-परवडतं, तेच जातात- हे नेहमीचंच! मग यंदा, "आनंदयात्री' होणं, जमवायचं की, भाऊबंदकी करत, गमवायचं, तुम्हीच ठरवा। "माझंच खरं' असंही म्हणता येतं- "त्याचंही चूक नाही,' हेही जाणता येतं-! आता वाद पेटवायचे, की भेद मिटवायचे- तुम्हीच ठरवा-! कोकणात धडकायचं की सॅन होजेत फडकायचं- तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा! शेवटी, कवीनं ठरवलं- आधी गाठू रत्नागिरी नंतर नेलंच मंडळानं, तर करू सॅन-होजेचीही वारी! आणि टोचत होतं, तरी कवी कुंपणावर बसून राहिला. - बण्डा जोशी







function CloseWindow() {window.close() }

No comments: